कारवार, बंगळूरसह सतरा ठिकाणी 'एसीबी'चे छापे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 डिसेंबर 2018

बंगळूर : बंगळूर, कारवार, म्हैसूर, दावणगेरी, चिकमंगळूरसह कर्नाटकमधील 17 ठिकाणी एकाच वेळी छापे घालून भ्रष्टाचार नियंत्रण पथकाने (एसीबी) पाच अधिकाऱ्यांजवळ असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा शोध लावला आहे. 

सहकारी संघाच्या निबंधक कार्यालयातील अतिरिक्त निबंधक आर. श्रीधर, दावणगेरी कृषी खात्यातील उपसंचालिका हंसवेणी, बृहन्बंगळूर महापालिकेतील शहर योजना सहायक संचालक बिसट्टप्पा, म्हैसूर विकास प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता के. मणी व मंगळूर सरकारी शिक्षण महाविद्यालयातील रीडर मंजुनाथ या अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर छापे घालण्यात आले. 

श्रीधर यांचे अली ऑस्कर मार्गावरील कार्यालय, बंगळूर येथील घर, चिंतामणी येथील त्यांच्या दोघा नातलगांची निवासस्थाने येथे छापे घालण्यात आले. हंसवेणी यांचे कार्यालय, घर, त्यांचे पती कार्य करीत असलेली कारवार येथील कार्यालयांवर छापे घालून हरपनहळ्ळी तालुक्‍यातील तेलगी गावातील 15 एकर जमीन, पाच स्कूटर, सोन्या-चांदीचे दागिने, अशी मोठी संपत्ती असल्याचा शोध लावण्यात आला. 

उद्या माहिती समजणार 

बिसट्टप्पा यांच्या युटीलिटी बिल्डिंगमधील शहर योजना पूर्व कार्यालय, त्यांचे निवासस्थान, के. मणी यांची म्हैसूर येथील कार्यालये, घर, हुनसूर येथील नातलगाचे घर व मंजुनाथ यांच्या उडपीतील दावनगेरे, चिकमंगळूर जिल्ह्यातील घरे, मंगळूर येथील कार्यालय, येथे एकाच वेळी छापे घालून चौकशी केली. सर्व ठिकाणी स्थानिक एसपींच्या नेतृत्वाखाली छापे घालण्यात आले. शुक्रवारी (ता. 28) सायंकाळपर्यंत संपत्तीचा शोध घेण्यात येत होता. उद्यापर्यंत (ता.29) त्यांनी मिळविलेल्या संपत्तीची माहिती उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ACB raid in 17 places with Karwar Bangalore