राष्ट्रपती निवडणूक तयारी वेगात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

presidential election

राष्ट्रपती निवडणूक तयारी वेगात

नवी दिल्ली - येत्या १८ जुलै रोजी (सोमवारी) होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या तयारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने वेग दिला आहे. विविध राज्यांत मतपेट्या व मतपत्रिकांसह अन्य सामग्री विमानांद्वारे रवाना करण्यात येत आहे. मतदानानंतर याच पध्दतीने या सीलबंद मतपेट्या राज्यसभा सचिवालयाकडे पोहोचतील. २१ जुलै (गुरूवार) भारताच्या नवीन उपराष्ट्रपीतंची निवड होईल.

आगामी राष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ भाजप आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेले यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. या दुरंगी लढतीत श्रीमती मुर्मू यांचे पारडे जड आहे. या निवडणुकीचे संपूर्म संचलन राज्यसभा सचिवालय करते. त्यादृष्टीने येत्या १८ तारखेला संसदेत जेथे खासदारांचे प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्या ६३ क्रमांकाच्या दालनातील तयारीवरही अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. याच ठिकाणी विविध राज्यांतील आमदारांच्या मतपत्रिका असलेल्या सीलबंद पेट्या अभूतपूर्व कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह विविध राज्यांत मतपेट्या विशेष विमानांद्वारे पोहोचविण्यात येत आहेत. त्यासाठी संबधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांंतील वरिष्ठ सनदी अधिकारी रिटर्निंग आॅफिसर म्हणून दिल्लीत येतात. त्यांच्याकडे एका विशिष्ट पध्दतीनुसार मतदानासाठीची सामग्री सुपूर्त केली जाते व विमानाने ते राज्यांत परततात. ही सामग्री ज्या विमानातून जाते त्यासाठी तिकीट आरक्षित करण्याचीही खास प्रक्रिया आहे. हे तिकीट ‘मिस्टर बैलेट बॉक्स‘ या नावाने आरक्षित केले जाते. सर्व राज्यांमध्ये उद्या (ता.१४) खेरपर्यंत मतपत्रिका, मतपेट्या व इतर सामग्री पोहोचविण्यात येणार आहे. त्या त्या राज्यांच्या विधीमंडल इमारतींमध्ये जेथे ही निवडणूक सामग्री ठेवली जाते त्याचीही व्हिडीओग्राफी केली जाते. विधीमंडळ किंवा विधान भवनांनी त्यासाठी ‘स्ट्रॉंग रूम' तयार करणे अपेक्षित असते.

Web Title: Accelerate Preparations For Presidential Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..