बदल स्वीकारा, कॅशलेस व्हा!: मोदींचा तरुणांना संदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: देशातील तरुणांसह सर्वांनिच बदल स्वीकारत कॅशलेस व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

नवी दिल्ली: देशातील तरुणांसह सर्वांनिच बदल स्वीकारत कॅशलेस व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

मोदी यांनी लिंक्‍ड-इन या सोशल नेटवर्किंग साईटवर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी देशवासियांना 'कॅशलेस' होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "रोख रकमेचे अधिक प्रमाण हा भ्रष्टाचार व काळ्या पैशाचा प्रमुख स्रोत असून आता लोकांनी नवा बदल स्वीकारत कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे. एकविसाव्या शतकात भ्रष्टाचाराला स्थान नाही. भ्रष्टाचारामुळे आर्थिक गती मंदावते आणि गरीब व मध्यमवर्गीयांची स्वप्नांवर कुऱ्डाड पडते', असे सांगत मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला "ऐतिहासिक' असे संबोधले आहे.

'आज आपण मोबाईल बॅंकिंग आणि मोबाईल वॉलेट्‌सच्या जगात राहतो. जेवणाची ऑर्डर, फर्निचरची खरेदी विक्री, टॅक्‍सी बुकिंग यासारख्या गोष्टी मोबाईलवरुन सहज शक्‍य आहेत. तंत्रज्ञानाने आपल्या जीवन वेगवान आणि सोयीस्कर बनविले आहे', असेही मोदी यांनी पुढे म्हटले आहे. या लेखामध्ये मोदींनी काही कॅशलेस पर्यायांची चित्रे आणि मोदी यांनी जाहीर सभेत भ्रष्टाचार बंद करण्याच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

Web Title: Accept Change, Be Cashless - Narendra Modi