अखिलेशला हटविल्यावरच 'युपी'त 'अच्छे दिन' : शहा

वृत्तसंस्था
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

आरोहा (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भ्रष्ट नेत्याची उपमा देत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अखिलेश यांना पदावरून हटविल्यानंतरच उत्तर प्रदेशमध्ये "अच्छे दिन' येतील, असा दावा प्रचारसभेत बोलताना केला आहे.

आरोहा (उत्तर प्रदेश) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भ्रष्ट नेत्याची उपमा देत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अखिलेश यांना पदावरून हटविल्यानंतरच उत्तर प्रदेशमध्ये "अच्छे दिन' येतील, असा दावा प्रचारसभेत बोलताना केला आहे.

आरोहा येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना शहा म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये दररोज गुंडगिरी, बलात्कार, खून, दरोडा, दंगली होत असताना आपण विकासाची अपेक्षा कशी करू शकतो. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशला अनेक बाबीत प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे. त्यामध्ये खून, बलात्कार, अपहरण, दंगलींचा समावेश आहे. अखिलेश आणि राहुल उत्तर प्रदेशच्या जनतेला फसविण्याचा प्रयत्न करत आहेत. जर उत्तर प्रदेशमधील नागरिकांना या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत निवडून देण्यास मदत करायला हवी. त्यानंतरच 11 मार्च रोजी 'अच्छे दिन' येतील.'

अलिकड येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'आता उत्तर प्रदेशला गैरव्यवहार नको; तर कमळ हवे आहे. उत्तर प्रदेशने मला इतके काही दिले आहे; मलाही या राज्यासाठी काम करण्याची इच्छा आहे.' दरम्यान, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी कानपूर येथील संयुक्त प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "मोदीजी यांनी गैव्यवहाराची एक योजना आणली आहे. जो व्यक्ती गैरव्यवहारांमध्ये अडकलेला असतो; त्याला सगळीकडे गैरव्यवहार दिसतो' अशी टीका केली.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. 11 फेब्रुवारीपासून सुरू होणारी मतदान प्रक्रिया 8 मार्चपर्यंत चालणार आहे.

Web Title: Acche din will come after dethrone of Akhilesh : Amit Shah