वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक नदीत कोसळला ; 21 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

एका लग्नसमारंभासाठी हा ट्रक मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून सीधीच्या दिशेने जात होता. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली. हा ट्रक 60 फूट उंचीवरुन नदीत कोसळला. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

भोपाळ : मध्यप्रदेश राज्यात वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. नदीत पडलेला हा ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु करण्यात आले आहेत. क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक बाहेर काढण्यात येत आहे. 

Madhya pradesh truck accident in river

एका लग्नसमारंभासाठी हा ट्रक मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून सीधीच्या दिशेने जात होता. त्यादरम्यान ही दुर्घटना घडली. हा ट्रक 60 फूट उंचीवरुन नदीत कोसळला. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.  

Web Title: Accident 21 die after bus carrying baraatis falls off bridge in Madhya Pradesh 20 injury