ट्रक-जीपमध्ये भीषण अपघात; 11 जण ठार

वृत्तसंस्था
Saturday, 14 March 2020

- राजस्थानच्या जोधपूर येथे ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघात.

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथे ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ही घटना बालोत्रा-फलोदी महामार्गावर घडली.  

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी 8 मार्चला जोधपूर-जयपूर राजमार्गावर बिनवास गावाजवळ एक ट्रक आणि बसमध्ये झालेल्या धडकेत बसमधील दोन महिलांसह चार जणांना मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये जीपचा चक्काचूर झाला. 

जोधपूरचे पोलिस अधीक्षक राहुल बारहट यांनी सांगितले, की बस जोधपूरपासून अजेमर जात होती, तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे पुलाचे बांधकाम सुरु होते. 

Accident Twitter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Balotra phalodi highway in Jodhpur district