धुक्‍यामुळे 50 वाहने धडकून अपघात; 2 ठार, 36 जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 29 जानेवारी 2017

जयपूर (राजस्थान) - दाट धुक्‍यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर आज सकाळी पन्नास वाहने एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

जयपूर (राजस्थान) - दाट धुक्‍यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर आज सकाळी पन्नास वाहने एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

आज सकाळी सात वाजता जयपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर पन्नास वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. सुरुवातीला काही वाहनांची टक्कर झाली होती. मात्र, दाट धुक्‍यामुळे मागून येणारी वाहने धडकू लागली. या प्रकारात पन्नास वाहने अपघातग्रस्त झाली. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांची जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत रांग लागली होती. या अपघातात दोन जण ठार तर 36 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. वाहने आदळून झालेला हा अपघात इतका भीषण होता की बहुतेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील काही भागात गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्‍यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतुकीसह रेल्वे आणि हवाई वाहतूकीवरही विपरित परिणाम झाला आहे.

Web Title: Accident due to fog, 2 killed, 36 injured