डोळे थकलेले असतानाच 'त्या' 7 जणांवर मृत्युचा घाला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - शिफ्ट संपवून घरी टेम्पो ट्रॅक्‍सने घरी परतत असताना मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ट्रॅक्‍स खाणीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना कागल तालुक्‍यातील बस्तवडे येथे घडली. शिफ्ट संपवून घरी परतत असताना मध्यरात्रीच्या एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीत एकूण 18 कामगार होते. यामधील 11 कामगारांना वाचवण्यात यश आले . मात्र सात कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हे सर्व एमआयडीसीतील कर्मचारी होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुूंबांची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असल्याने कुटूंबे अक्षरक्ष: उघड्यावर आली आहेत.

निपाणी-मुरगुड राज्य मार्गावर निपाणीपासून 14 किलोमीटरवर अंतरावर बस्तवडे गाव येते. कागल तालुक्‍यातील शेकडो तरुण रोज खासगी ट्रॅक्‍स करून कागल औद्योगिक वसाहतीत नोकरीला जातात. प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी असा प्रवास केला जातो. त्यांची दुपारी 4 ते रात्री 12 अशी ड्युटी होती. सगळे जण 12.30 वाजेपर्यंत एकत्र जमतात आणि गावी परततात. दिवसभराच्या कष्टाने थकलेले शरीर निद्रित अवस्तेतच कायमचे मिटले. चालकाच्या डोळ्यावर झापड येऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. अपघातातील जखमींना मुरगूडच्या रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. मुरगूड येथे नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मृतांमध्ये हळदी गावच्या संदीप लुल्ले, बाबुराव कापडे, आकाश ढोले तर बेनीग्रे येथील शहाजी जाधव आणि हमीदवाडा येथील विनायक चोपडे, किशोर कुंभार, उदय चौगुले यांचा समावेश आहे.

Web Title: Accident in Kolhapur 7 dead