गुलबर्गाजवळ अपघातात सोलापूरचे पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

देवदर्शन करून परत आपल्या मूळ गावी येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक घटना मंगळवारी पहाटे समोर आली. याच अपघातात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येेथे झाला आहे. 

गुलबर्गा : देवदर्शन करून परत आपल्या मूळ गावी येत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक घटना मंगळवारी पहाटे समोर आली. याच अपघातात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येेथे झाला आहे. 

श्रावणनिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चडचणे कुटुंबीय दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते, देवदर्शन आटोपून सोमवारी मूळगावी परत येत असताना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद आळंदी ते अपघात झाला या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच आळंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळता चिंचपूर गावावर शोककळा पसरली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near gulbarga 5 dies from solapur