बेळगाव : खानापूरजवळ वऱ्हाडाच्या टेंपोला अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (४०), मोहन राजू कर्लेकर (२०), प्रकाश बुधाप्पा पाटील (५०), मल्लू शंकर पाटील (६०), किसन कौलकर (१६), बसवाणी एम.हलगेकर (५५), ओमकार संभाजी धबाले (१२), नागेश पुंडलिक आजरेकर (१४) आणि संदेश विठ्ठल दळवी (२६)

याबाबतची अधिक माहिती अशी, नंदगड येथील वऱ्हाड गणेबैल येथे गेले होते. लग्न आटोपून कांही तरूण एका टेंपोतून नंदगडला परत निघाले होते. टेंपो हत्तरगुंजी फाट्यावर येताच चालकाचे नियत्रंण सुटल्याने तो उलटला. महामार्गाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजुला माती पसरविण्यात आली आहे. टेंपो मातीत फसल्याने मोठी दुर्घटना टळली. कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र १२ जणांच्या हात आणि पायांना जबर मार बसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तिघांवर खानापुरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

किरकोळ जखमी झालेल्यांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. अपघाताची बातमी शहरात समजल्यानंतर नागरीकांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे नेमके काय झाले हेच कुणाला समजत नव्हते. नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केल्यामुळे उपचार करणेही अवघड जात होते. माजी आमदार अरविंद पाटील यांनी जमावाला बाहेर करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident near Khanapur in Belgaum