निपाणीजवळ दुचाकी मैलाच्या दगडाला धडकून एक ठार, १ गंभीर 

निपाणीजवळ दुचाकी मैलाच्या दगडाला धडकून एक ठार, १ गंभीर 

निपाणी - भरधाव जाणारी दुचाकी रस्त्याकडेला असलेल्या मैलाच्या दगडाला धडकली. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निपाणी जवळील तवंदी घाटाच्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

केतन शिवाजी पाटील (वय २६ रा. अष्टविनायकनगर निपाणी असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर रजेश पाटील असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमींवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, केतन पाटील व राजेश पाटील हे दुचाकी (क. के. ये. २३ इ कयू. ४८२२)वरून निपाणीहून संकेश्वरच्या दिशेने महामार्गावरून जात होते. यावेळी केतनचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्याकडेला असलेल्या मैलांच्या दगडाला दुचाकीने जोराची धडक दिली. त्यामध्ये केतनला बरगड्याजवळ जोराचा मुक्का मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला राजेश पाटील हा दूरवर जाऊन फेकल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पुंजलॉईडच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केतनला वाचवण्याचा प्रयत्न केला.पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तात्काळ १०८ आरोग्य कवच वाहनातून गंभीर जखमी राजेश पाटील याला गांधी स्पर्धेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुचाकी वेगाने असल्याने दगडाला धडकून त्याचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती अष्टविनायक परिसरात समजताच नातेवाईकांसह मित्रमंडळींनी घटनास्थळासह गाळा स्कूलमध्ये मोठी गर्दी केली होती.

केतन पाटील यांचा ट्रकचा व्यवसाय असल्याने तो सर्वांच्याच परिचयाचा होता. काही महिन्यांपूर्वी त्याचा विवाह ठरला होता. दिवाळीनंतर ताे होणार होता. पण अचानकच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने निपाणी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याच्या मागे आई वडील भाऊ असा परिवार आहे.

घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक, पोलीस उपनिरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्यासह सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला निपाणी शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com