'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना जीएसटी गैरव्यवहारात बेड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना वस्तू आणि सेवा कर इंटेलिजन्स विंगने विजय गुट्टे यांना बेड्या घातल्या आहेत. 

मुंबई : 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बायोपिकवर प्रदर्शनापुर्वीच संकट आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. 34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना वस्तू आणि सेवा कर इंटेलिजन्स विंगने बेड्या घातल्या आहेत. 

विजय यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. विजय हे उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांचे सुपुत्र आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावरही 5500 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. 

काय आहे 34 कोटींची फसवणूक​? 
विजय गुट्टे यांची व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने होरायझन आऊटसोर्स सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मिळालेल्या अॅनिमेशन आणि मॅनपावर सर्व्हिससाठी 34 कोटी रुपयांच्या जीएसटीची बनावट इनव्हॉइसेस घेतल्याचा आरोप आहे. वस्तू आणि सेवा कर गुप्तचर विभागाच्या महासंचालकांनी 173 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याचा तपास मे महिन्यात सुरु केला होता. या तपासादरम्यान विजय यांचे नाव समोर आले. विजय यांनी होरायझन कंपनी कडून कुठलीही सेवा घेतली नव्हती. 

नगरोब ुहूूा

विजय तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. जीएसटी कायद्याच्या कलम 132 (1) (क) अंतर्गत अटक त्यांना केली आहे. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाच्या निमित्ताने विजय गुट्टे यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे. याशिवाय 'इमोशनल अत्याचार', 'टाईम बरा-वाईट' आणि 'बदमाशिया' या तीन सिनेमांची निर्मिती विजय यांनी केली आहे.   

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

      

Web Title: The Accidental Prime Ministers Directed Vijay Gutte Arrested For GST Fraud