पतीनेच फेकले पत्नीवर ऍसिड

पीटीआय
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - सासरी जाण्यास नकार देणाऱ्या महिलेवर तिच्या पतीनेच ऍसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - सासरी जाण्यास नकार देणाऱ्या महिलेवर तिच्या पतीनेच ऍसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.

अमरप्रीतकौर (वय 20) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती प्रदीपसिंग याला अटक करण्यात आली आहे. प्रदीपसिंग याने डिस्ट्रिक्‍ट पार्कमधील सेक्‍टर 16 मध्ये काल सायंकाळी अमरप्रीत हिच्यावर ऍसिड हल्ला केला. ती 5 ऑक्‍टोबरपासून सासर सोडून माहेरी राहत होती. काल प्रदीपने तिला भेटून सासरी येण्याचा आग्रह केला. यावरून दोघांचे भांडण झाले. यातूनच त्याने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. यात पती व पत्नी दोघे 35 ते 40 टक्के भाजले. दोघांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. यात अमरप्रीत हिची लहान बहीणही किरकोळ जखमी झाली.

Web Title: acid attack on wife