...ही दहशतवादाबद्दलची सरकारची असहिष्णुता: भाजप

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्यावर कारवाई करून केंद्र सरकारने आपण दहशतवादाबद्दल असहिष्णू असल्याचे दाखवून दिले आहे, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केल्या आहेत.

नवी दिल्ली - वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्यावर कारवाई करून केंद्र सरकारने आपण दहशतवादाबद्दल असहिष्णू असल्याचे दाखवून दिले आहे, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलीन कोहली म्हणाले, जर सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्यावर कारवाई केली; तर देशहितासाठी कोणीही त्याला विरोध करण्याचे कारण नाही.' तसेच दहशतवादाकडे जर मानवतेच्या किंवा अन्य कोणत्याही विचारातून पाहिले जात असेल तर असे विचार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते हिंसकच आहेत', असेही त्यांनी पुढे सांगितले. अशा प्रतिक्रिया भाजपच प्रवक्ते संबित पात्रा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "केंद्र सरकारने दहशतवाद सहन केला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. त्यादृष्टिने सरकारने हे पाऊल उचलले आहे. सरकार जे काही करत आहे त्याचे स्वागत करायला हवे.'

एनआयएकडून झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहा ठिकाणी छापे टाकून चौकशीस सुरूवात केली. यामुळे झाकीर नाईक अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Action against Zakir Naik shows Centre’s zero tolerance towards terrorism: BJP