विनापरवाना उपहारगृहांवर गोव्यात कारवाई

अवित बगळे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पणजी : गोव्याच्या किनारी भागात विशेषतः विदेशी नागरीकांकडून चालवण्यात येणाऱ्या विनापरवाना उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन खात्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे आहे. ही उपहारगृहे अमली पदार्थांचे अड्डे झाल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

पणजी : गोव्याच्या किनारी भागात विशेषतः विदेशी नागरीकांकडून चालवण्यात येणाऱ्या विनापरवाना उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन खात्याकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे आहे. ही उपहारगृहे अमली पदार्थांचे अड्डे झाल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

 परवाना न घेता अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या किनारी भागातील उपहारगृहांवर अन्न व औषध प्रशासन खात्याने हातोडा उगारला आहे. काल मोरजीतील तीन उपहारगृहे खात्याने बंद केली. दोन दिवसांपूर्वी मोरजीतीलच एका उपहारगृहाचा परवाना हलक्या दर्जाच्या अन्नपदार्थांच्या पुरवठ्याच्या कारणावरून कायमचा रद्द केला आहे.

या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार बहुतांश उपहारगृहे विदेशी नागरीक चालवतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नसतात. ही उपहारगृहे व शॅक अमली पदार्थ पुरवठ्याचे अड्डे बनतात. पोलिस बंदोबस्तात खाते परवाने व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे काम करेल. नियमभंग केल्याचे आढळल्यास परवाने तत्काळ रद्द केले जातील.

त्यानुसार काल मोरजी येथे खात्याने आपल्या कारवाईस सुरवात केली. सोमा प्रोजेक्ट लिविंग रूम रिसॉर्टचे उपहारगृह सर्व परवाने घेतल्याशिवाय सुरु करण्यात येूऊ नये अशी तंबी त्यांना देण्यात आली. विठ्ठलदासवाडा येथील बोराबोरा लॉंज रेस्टॉरंट हे उपहारगृह बंद करण्याचा आदेश देण्यात आला तर फिश हे उपहारगृहही बंद करण्यात आले. त्यांना अन्न सुरक्षा व गुणवत्ता कायद्यातील तरतुदींनुसार नोटीशी बजावल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले, की परवा मारवेला या उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तेथे अत्यंत खालच्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्यात येत असल्याचे आढळले होते. जनहिताच्यादृष्टीने परवाना रद्द केला असून त्याबाबत फेरविचार केला जाणा्र नाही.

Web Title: action on illegal hotels in goa