जहांगीरपुरीत दोन आठवडे ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश

बुलडोझर कारवाईला स्थगिती
action on illegal constructions at Jahangirpuri stop till Hearing ordered by court
action on illegal constructions at Jahangirpuri stop till Hearing ordered by court sakal

नवी दिल्ली : जहांगीरपुरी येथील बेकायदा बांधकामांवर आता दोन आठवडे बुलडोझर चालवला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश जारी केला आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. जहांगीरपुरीमधील हिंसाचारानंतर बुधवारी जमियत उलेमा-ए-हिंदच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झालेल्या विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी हा राष्ट्रीय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले. यासोबतच त्यांनी एका समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप केला. सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी दुष्यंत दवे म्हणाले की, यापूर्वी कधीही अशी कारवाई झालेली नाही.

कायदेशीरदृष्ट्या पाच ते पंधरा दिवसांची नोटीस द्यायला हवी होती. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने अनेकदा नोटीसचा कालावधी वाढवला आहे. दिल्लीत एक हजार ७३१ अनधिकृत वसाहती आहेत. तेथे सुमारे ५० लाख लोक राहतात. मात्र एकाच वसाहतीला लक्ष्य केले जात आहे. कपिल सिब्बल दुसऱ्या एक याचिकेवर बाजू मांडताना म्हणाले की, अतिक्रमण आणि बेकायदा बांधकाम ही संपूर्ण देशाची समस्या आहे. पण त्याच्या नावाखाली ते एका समुदायाला लक्ष्य करत आहेत. देशाच्या इतर राज्यांमध्येही अशा घटना घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘केजरीवाल घरात का लपून बसले?’

जहांगीरपुरी भागातील ‘अतिक्रमण हटाओ’कारवाईवरून राजकारण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले असताना आम आदमी पक्ष आणि केंद्रातील भाजपमध्ये यावरून चिखलफेक रंगली आहे. त्यात आता काँग्रेसनेही या लढाईत उतरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. दोन धर्मांतील कटुता दूर करण्याची जबाबदारी असताना केजरीवाल घरात का लपून बसले, असा सवाल काँग्रेसने केला.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस अजय माकन यांच्या नेतृत्वाखालील जहांगिरपुरी भागाची पाहणी केली. तसेच प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तामुळे काँग्रेस नेत्यांना हे धरणे आंदेालन आवरते घ्यावे लागले.

माकन यांनी दिल्ली प्रशासनाची बुलडोझर कारवाई बेकायदा असल्याचा आरोप केला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले. हिंदू मुस्लिमांमधील कटुता दूर करण्याची व दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची जबाबदारी कोणाची आहे, केजरीवाल घरात का लपून बसले, असा सवाल चौधरी यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com