आलोकनाथ यांना अटकपूर्व जामिन मंजूर

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांना आज अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे आलोकनाथ यांची अटक तूर्त टळली आहे.

मुंबई : बलात्काराचे आरोप असलेले 'संस्कारी बाबू' अभिनेते आलोकनाथ यांना आज (शनिवार) दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. लेखिका, निर्मात्या विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले.

आलोकनाथ यांनी बलात्कार केला, असा आरोप नंदा यांनी केला होता. त्यानंतर आलोकनाथ चर्चेत आले होते. लैंगिक शोषणाबाबत सुरु असलेली मोहीम #MeToo मध्येही आलोकनाथ यांचे नाव समोर आले होते. नंदा यांच्या आरोपावरून आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आलोकनाथ यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांना आज अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे आलोकनाथ यांची अटक तूर्त टळली आहे.

Web Title: Actor Aloknath Granted Anticipatory Bail