कादर खान यांच्या निधनाची अफवा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

ज्येष्ठ अभिनेते व संवाद लेखक कादर खान यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले आहे. मात्र ही अफवा असून, निधनाबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. आपले वडील आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा खुलासा कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी केला आहे.
 

नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते व संवाद लेखक कादर खान यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाले आहे. मात्र ही अफवा असून, निधनाबाबतच्या सर्व बातम्या खोट्या आहेत. आपले वडील आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत, असा खुलासा कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी केला आहे.

कादर खान यांना गंभीर आजार झाल्याच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. कादर खान यांच्या निधनाचे वृत्त आकाशवाणीच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरूनही प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या निधनाची बातमी दाखविण्यास सुरवात केली. त्यांना श्‍वसनाचा त्रास होत आहे.

ते सध्या कॅनडात उपचार घेत आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी केली आहे. अमिताभ बच्चन यांनीदेखील कादर खान यांना लवकर बरे वाटावे, असे ट्‌विट काही दिवसांपूर्वी केले होते. तसेच, त्यांच्याबरोबर काम करतानाच्या आठवणी जागविल्या आहेत. कादर खान यांच्या निधनाच्या अफवा या आधी अनेक वेळा पसरल्या होत्या, त्या वेळी त्यांनीच "माझा मृत्यू झाला नसून, मी जिवंत आहे,' असे स्पष्ट केले होते.

Web Title: actor Kader Khan is alive, son dismisses death rumours