अभिनेता स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्याने त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक असल्याचे स्वप्नील जोशी सांगतो.

सध्या देशात आयपीएल 2018 चे वारे जोमाने वाहत आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडा चाहत्यांमध्ये आहे. मात्र, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण, पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी येत्या 27 मे ला होणाऱ्या VIVO IPL च्या अंतिम सामन्याद्वारे मराठी माणसांना मिळणार आहे. VIVO IPL च्या अंतिम सामन्याच्या या खास कार्यक्रमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे.

मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आयपीएल 2018 च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्याने त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक असल्याचे स्वप्नील जोशी सांगतो.
 
27 मे ला होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येणार असल्यामुळे, या दुर्मिळ संधीचा प्रेक्षकांनी पुरेपूर आस्वाद घ्या.

​आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

    Web Title: Actor Swapnil Joshi will make commentary in the final match of IPL