कलावंत मोदींच्या पाठीशी !

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर उसळलेल्या गोंधळात बॅंकांसमोरच्या रांगांत उभ्या असलेल्या लोकांमध्ये असंतोष असल्याचे काही प्रसारमाध्यमांतील वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे प्रसिद्ध गायक भारत बल्लवली यांनी "सकाळ'ला सांगितले. बल्लवली यांच्यासह वीर सेनानी फाउंडेशन या संस्थेने मुंबईत काही तास केलेल्या सर्वेक्षणात 99 टक्के लोकांनी पंतप्रधानांच्या काळ्या पैशांविरुद्धच्या मोहिमेला पाठिंबा दर्शविणाऱ्या स्वाक्षऱ्या केल्याचेही सांगण्यात आले.

वीर सेनानी फाउंडेशन ही संस्था आजी-माजी सैनिकांसाठी काम करते. बल्लवली यांच्यासह संस्थेचे कर्नल (निवृत्त) विक्रम पत्की, ज्ञानेश परांजपे, प्रा. ए. पी. कुलकर्णी यांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर आदींची भेट घेऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्यांना दिले. बल्लवली म्हणाले, की काळा पैसा व भ्रष्टाचार यांचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जे पाऊल उचलले ते एखादा धाडसी माणूसच उचलू शकतो, त्यामुळे याबाबत लोकांनी अफवा पसरविणाऱ्यांपासून सावधान राहावे. आम्ही मुंबईत बॅंकांच्या रांगांत उभे राहिलेल्या सुमारे 800 लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. आम्ही अवघे काही तास ही मोहीम राबविली; मात्र अनेक तास रांगांत उभे असलेल्या 99 टक्के लोकांनी सांगितले की, "आम्हाला आज थोडा त्रास होत असला, तरी मोदी यांचा निर्णय अत्यंत योग्य आहे. भ्रष्टाचारी व काळा पैसा दडविणारे यांच्यावरील मोदींचा हा सर्जिकल स्ट्राइक अंतिमतः देशहिताचाच आहे.'

Web Title: Actors supported Narendra Modi