
- आधी अभिनंदन मग माफीनामा
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात आत्तापर्यंत 2800 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या व्हायरसने अक्षरश: थैमान घातले. त्यानंतर आता भारतात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला. त्यामुळे एका अभिनेत्रीने चक्क देशातील नागरिकांचे अभिनंदनच केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती असलेल्या चार्मी कौरने टिक-टॉकवर व्हिडिओ शेअर केला आहे. चार्मीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने ट्विटवरून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाली चार्मी कौर
चार्मीने या व्हिडिओत म्हटले, की कोरोना व्हायरस दिल्ली आणि तेलंगणा या राज्यात आला आहे. ही सर्व माहिती मी ऐकली आणि बातमीही वाचली. पुढे जाऊन ती म्हणाली, की अभिनंदन, कोरोना व्हायरस आला आहे.
What is she even thinking? #coronavirus #coronavirusindia #CoronaOutbreak #charmme pic.twitter.com/0UUJ2KbYdt
— T S Sudhir (@Iamtssudhir) March 2, 2020
आधी अभिनंदन मग माफीनामा
चार्मी कौरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर तिच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. अखेर तिला याप्रकरणी माफी मागावी लागली आहे. चार्मी म्हणाली, की मी तुमच्या सर्वांचे कमेंट्स वाचले. त्या व्हिडिओबद्दल मी माफी मागते. हा एक संवेदनशील विषय आहे. इथून पुढे असे कोणतेही विधान करताना लक्ष देईन.
अनेक चित्रपटांत भूमिका
चार्मी कौरने अनेक चित्रपटांत काम केले. तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटातही काम केले. त्यामध्ये 'मुझसे दोस्ती करोगे', 'बुढ्ढा होगा तेरा बाप', 'आर राजकुमार' या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या.