माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची 'ऑफर' ?

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घटक पक्षांच्या नेत्यांसह समाजातील प्रसिद्ध व्यक्तींची भेट घेतली जात आहे. त्यानुसार अमित शहा लता मंगेशकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचीही भेट घेणार आहेत.

मुंबई : भाजपकडून सुरु करण्यात आलेल्या 'संपर्क समर्थन अभियानां'तर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची मुंबईतील तिच्या निवासस्थानी भेट आज (बुधवार) घेतली. या भेटीदरम्यान अमित शहांनी माधुरी दीक्षितला राज्यसभेची 'ऑफर' दिल्याची चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये सुरु आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घटक पक्षांच्या नेत्यांसह समाजातील प्रसिद्ध व्यक्तींची भेट घेतली जात आहे. त्यानुसार अमित शहा लता मंगेशकर आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचीही भेट घेणार आहेत. यावेळी अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देणार आहेत.

भाजपच्या या अभियानात अमित शहा 50 लोकांची भेटी घेणार आहेत. यापूर्वी अमित शहा यांनी क्रिकेटर कपिल देव, देशाचे माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी आणि योगगुरु रामदेव आणि माजी लष्करप्रमुख दलबिर सिंग सुहाग आणि अन्य लोकांची भेट घेतली.

Web Title: Actress Madhuri Dixit mights be gets Rajya Sabha offer