'चौकीदार'वर भडकल्या अभिनेत्री रेणुका शहाणे

Actress Renuka Shahane criticized the campaign of Main Bhi Chowkidar
Actress Renuka Shahane criticized the campaign of Main Bhi Chowkidar

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात काही दिवसांपूर्वी 'मीटू' अभियान जोरात गाजले. यात अनेक बड्या नावांसोबत एक नाव होते माजी परराष्ट्र राज्य मंत्री ए जे अकबर. महिला पत्रकारांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर अकबर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना आजही एका प्रसिद्ध महिलेने ट्विटरवर 'मीटू' अभियानाची आठवण काढून देत टिका केली आहे. निमित्त होते 'मै भी चौकीदार' या सध्या व्हायरल होत असलेल्या हॅशटॅगचे.

अकबर यांनी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 'मै भी चौकीदार' हॅशटॅग अंतर्गत ट्विट केले. ज्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी बेशर्मीची पण सीमा असते असे म्हणत उत्तर दिले आहे. अकबर यांचे ट्विट असे आहे की, ''मै भी चौकीदार या अभियानात सहभागी होताना मला आनंद होत आहे. या देशाचा नागरीक असल्याच्या हक्काने मी देशातील भ्रष्टाचार, घाण, गरीबी, दहशतवाद घालवून एक मजबूत आणि सुरक्षित भारत बनविण्यात माझे योगदान राहील.' पण या ट्विटवर रेणुका शहाणे यांनी म्हटले की, 'जर तुम्ही पण चौकीदार असाल तर कोणतीच महिला सुरक्षित राहु शकत नाही. लाज न वाटण्याला सीमा असते.' 

तसेच राष्ट्रीय किसान महासंघाचे सदस्य संदिपआबा गिद्दे-पाटील यांनीही ट्विटवर आपल्या नावापुढे चौकीदार असा उल्लेख केला आहे. त्यांनीही शहाणे यांनी अकबर यांच्या ट्विटवर मांडलेल्या मताला खोडून काढत म्हटले आहे की, 'तुम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवता आणि समाजाला खडबडून जागे करता म्हणजे तुम्ही पण या देशातील जागरूक चौकीदार आहात... माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पण अभिमानाने म्हणा.' यावर शहाणे यांनी जोरदार प्रतियुत्तर दिले आहे. त्या म्हणतात, 'कुठल्याही हॅशटॅग मुळे मी ना तर माझं नाव बदलेन ना तुम्हाला एखादी गोष्ट ऐकायची आहे म्हणून मी म्हणेन. मी माझ्या स्वतःची बुद्धी वापरून जर काही म्हणायचंच झालं तर अभिमानाने म्हणेन की मी एक जागरुक आई व अभिनेत्री आहे आणि एक कर्तव्यनिष्ठ नागरिक आहे. तुमचं चालू द्या. धन्यवाद'
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com