अभिनेत्री रिमी सेनचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. देशातील पाच राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमिवर अनेकजण विविध पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.

रिमी सेन हिने हंगामा, धूम 2 सह विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. शिवाय, बिग बॉसमध्येही स्पर्धक होती. अभिनेता सनी देओल हा सुदधा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. पंजाब विधानसभा निवडणूकीत भाजपकडून दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अभिनेता अर्जुन रामपाल व जॅकी श्रॉफ यांनी काही दिवसांपुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती पुढे आली होती. परंतु, पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Actress Rimi Sen joins BJP