esakal | स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे; ओएलएक्सवरील जहिरातीने प्रशासन जागे
sakal

बोलून बातमी शोधा

Ad to sell Statue of Unity placed on OLX case filed

देशात कोरोना व्हायरचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी विकण्यासंबंधी ओएलएक्सवर ऑनलाइन जाहिरात देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्याची जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे; ओएलएक्सवरील जहिरातीने प्रशासन जागे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अहमदाबाद : देशात कोरोना व्हायरचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी विकण्यासंबंधी ओएलएक्सवर ऑनलाइन जाहिरात देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्याची जाहिरात देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओएलएक्सवर ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची विक्री करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. तसेच, या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे. गुजरात सरकारला कोरोना व्हायरच्या संकटावर मात करण्यासाठी हॉस्पिटल आणि मेडिकल उपकरणांसाठी पैशांची गरज आहे, यासाठी हा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा विक्री असल्याचेही सोबत म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएलएक्स कंपनीसोबत बातचीत झाल्यानंतर ही जाहिरात हटविण्यात आली आहे. दरम्यान, कोणी अशाप्रकारची जाहिरात वेबसाइटवर दिली होती, याचा शोध सुरु आहे. 

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४०००च्या वर; तर मृत्यूची संख्या...

तत्पूर्वी, जगभरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे तर एकूण ११७ जणांचा मृत्यू झाला आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे. मृत्यूंचा आकडा शंभरीपार झाल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. विविध राज्यांमधील वृत्तानुसार देशात आतापर्यंत करोनामुळे ११७ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ४२८८ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३२८ जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

तबलिगी जमातने पाकिस्तानची उडविली झोप; ४१ हजार जणांना शोधण्याचे लक्ष

दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ६९ हजार ४५६ जणांचा बळी घेतला आहे. तर १२ लाख ७३ हजार ४८६ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात ०२ लाख ६२ हजार ४८६ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे.

loading image
go to top