नोटा रद्दचा निर्णय अदाणी, अंबानींना माहिती होता: भाजप आमदार

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यापूर्वी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांना या निर्णयाबाबत माहिती होते असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील आमदार भवानी सिंह राजावत यांनी केला आहे. मात्र नंतर 'मी हे 'ऑफ रेकॉर्ड' बोललो होतो' असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

बुधवारी या आमदाराचा एक व्हिडिओ समोर आला. 'आधी सर्व चलन छापून घ्यायला हवे होते. देशाची लोकसंख्या आणि त्याप्रमाणात चलन छापायला हवे होते. मात्र पेट्रोलच्या किंमती जशा रात्री बारा वाजल्यापासून बदलण्याचे जाहीर करतात तसे 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याचे जाहीर केले', अशी टीका त्यांनी व्हिडिओत केल्याचे दिसत आहे. मात्र त्यानंतर या व्हिडिओबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी 'तसेच नोटा मी माझ्या मतदारसंघातील गावांना भेट द्यायला गेलो असताना काही पत्रकार माझ्याकडे आले आणि त्यांनी नोटा बंदीबाबत मला प्रतिक्रिया विचारल्या. मात्र मी "ऑफ रेकार्ड' जे बोललो ते त्यांनी अनैतिकपणे रेकॉर्ड केले', असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

नोटा रद्द करण्याचा निर्णय होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही बॅंका आणि एटीएमबाहेरील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी आता 18 नोव्हेंबरपासून एका दिवसात 4500 रुपयांऐवजी केवळ 2000 रुपयेच बदलून मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Adani, Ambani knew of cash scrap, says Rajasthan BJP MLA Bhawani Singh Rajawat