Adani Group: अदानी समुहाचा मोठा निर्णय! NDTV विविध भारतीय भाषांमध्ये 9 वृत्तवाहिन्या करणार सुरू|Adani Group’s NDTV to launch 9 regional news channels | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Adani Group

Adani Group: अदानी समुहाचा मोठा निर्णय! NDTV विविध भारतीय भाषांमध्ये 9 वृत्तवाहिन्या करणार सुरू

NDTV to Launch 9 New Channels: NDTV विविध भारतीय भाषांमध्ये 9 वृत्तवाहिन्या सुरू करणार आहे. 17 मे रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची परवानगी घेण्याच्या प्रस्तावाला बोर्डाने मान्यता दिली आहे.

मंत्रालयाच्या मंजुरीनंतर चॅनेल सुरू करण्याची तारीख स्टॉक एक्सचेंजला कळवली जाईल. AMG Media Networks ने 30 डिसेंबर 2022 रोजी राधिका रॉय आणि प्रणय रॉय यांच्याकडून NDTV मधील 27.26% भागभांडवल एका उपकंपनीद्वारे विकत घेतले होते, त्यानंतर AMG Media चा NDTV मधील एकूण स्टेक वाढून 64.71% झाला आहे.

NDTV ने या महिन्यात एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की कंपनीचे नवीन व्यवस्थापन आता कंटेंट आणि मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून दीर्घकालीन वाढ साध्य करता येईल.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी 1 मे रोजी वित्तीय वर्ष 23 चे निकाल जाहीर केल्यानंतर म्हणाले, 'अदानी समूहात, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रतिभेसह NDTV पुढे नेण्याचा आणि त्याला एक मल्टी-प्लॅटफॉर्म ग्लोबल न्यूज प्लॅटफॉर्म बनवण्याचा विशेषाधिकार आहे.

मीडिया कंपनीने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात लक्षणीय घट नोंदवली, मागील वर्षीच्या याच तिमाहीत 24.16 कोटी रुपयांच्या तुलनेत 97.5 टक्क्यांनी घसरून 59 लाख रुपये झाले.

कंपनीने ऑपरेशन्समधील एकत्रित महसुलातही घट अनुभवली आहे, मागील वर्षीच्या रु. 103.8 कोटी वरून 35.5 टक्क्यांनी घसरून रु. 66.96 कोटी झाली आहे.

आजपर्यंत, हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर मोठ्या प्रमाणावर स्टॉक किंमतीत फेरफार केल्याचा आरोप कले होते, हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारीत त्याचा अहवाल प्रकाशित केल्यानंतर NDTV च्या शेअरच्या किंमती जवळपास 39 टक्क्यांनी घसरल्या होत्या.