'मोदी-अमित शहा हा देश तुमच्या बापाचा नाही'; काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 जानेवारी 2020

खरे बोलल्यास देशद्रोही

- भारत मोदी-शहा यांच्या वडिलांचा नाही

कोलकाता : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाकिस्तानी म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर आज त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मी पाकिस्तानी आहे. पण तुम्हाला जे करायचे आहे, ते करू शकता. आपल्या देशात कोणीच खरे बोलू शकत नाही, कारण तुम्ही खरे बोललात तर तुम्हाला देशद्रोही घोषित केले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सतत अनेक वक्तव्ये करून अधीर रंजन चौधरी चर्चेत राहतात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना वादात सापडले आहेत. त्यावर चौधरी म्हणाले, भाजपकडून माझा परिचय पाकिस्तानचे असल्याचे करून देण्यात येतो. पण मी पाकिस्तानी आहे. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता.

Image result for Adhir Ranjan Chaudhari)

खरे बोलल्यास देशद्रोही

मी पाकिस्तानी आहे. तुम्हाला जे करायचे आहे, ते करू शकता. आपल्या देशात कोणीच खरे बोलू शकत नाही, कारण तुम्ही खरे बोलला तर तुम्हाला देशद्रोही घोषित केले जाते. 

भारत मोदी-शहा यांच्या वडिलांचा नाही

नरेंद्र मोदी आणि अमित शहा जे म्हणतील, तेच आपल्याला करायला सांगितले जाते. आम्हाला ते मान्य नाही. हा देश नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या वडिलांचा नाही. भारत कोणाच्या वडिलांची संपत्ती नाही. 

Image result for modi-shah

मोदी आणि शहा रामू-श्यामूची जोडी

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावरही चौधरी यांनी टीका केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही रामू-श्यामूची जोडी आहे. ते दोघेही लोकांची दिशाभूल करण्याचे मास्टर आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adhir Ranjan Chowdhury criticizes Narendra Modi and Amit Shah