आदित्यनाथांच्या बंगल्यात 'गौरी', 'नर्मदा', 'राजा' येणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील 5, कालिदास मार्ग या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यासोबत आणखीही काही रहिवासी येणार आहेत. त्यात योगी आदित्यनाथांच्या लाडक्‍या गाई आणि कुत्र्याचाही समावेश असेल. आदित्यनाथ या बंगल्यात राहण्यास आल्यावर आणखी काही बद अपेक्षित आहेत.

गोरखपूर - उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील 5, कालिदास मार्ग या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांच्यासोबत आणखीही काही रहिवासी येणार आहेत. त्यात योगी आदित्यनाथांच्या लाडक्‍या गाई आणि कुत्र्याचाही समावेश असेल. आदित्यनाथ या बंगल्यात राहण्यास आल्यावर आणखी काही बद अपेक्षित आहेत.

गोरखपूरच्या प्रख्यात गोरखनाथ मंदिराचे प्रमुख असलेले योगी आदित्यनाथ मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात रोज यज्ञ सुरू करण्याची शक्‍यता आहे. बंगल्यात मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या खोल्यांमधून कातडी सोफे आणि अन्य कातडी वस्तू हलविण्यात आल्या आहेत. योगी आदित्यनाथ पुढील मंगळवारी बंगल्यात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. गोरखनाथ मंदिराच्या गोशाळेतील दहा गाईसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी गोशाळा बांधली जात आहे. योगी आदित्यनाथ रोज पहाटे साडेपाच वाजता गाईंना स्वहस्ते गूळ, बिस्किटे, फळे आणि चारा देतात, अशी माहिती गोरखनाथ मंदिराचे एक कर्मचारी शिव परशन यांनी दिली. यातील काही गाईंना गौरी, नर्मदा, यमुना आदी नावेही योगी आदित्यनाथ यांनी दिली आहेत. गाईंबरोबरच योगी आदित्यनाथ यांचा लाडका "राजा' नावाचा श्‍वानही 5, कालिदास मार्गाचा रहिवासी होण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांना त्याचा लळा असून, रोज सायंकाळी ते त्याच्याबरोबर खेळतात. रोजची धार्मिक आन्हिके करताना वापरण्याची विशेष भगवी वस्त्रे आणि देवतांच्या मूर्तीही लवकरच बंगल्यात विराजमान होणार आहेत.

Web Title: Adityanath's dog, cow and other memeber will come in his new residence