आदित्यनाथांचे हेलिकॉप्टर अचानक शेतात उतरले 

पीटीआय
बुधवार, 16 मे 2018

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आज उघडकीस आली. योगी आदित्यनाथ यांना कासगंज येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या हेलिपॅडऐवजी एका शेतात उतरले. दरम्यान, मुख्यमंत्री सुरक्षित असून, त्यांचे नियोजित कार्यक्रम वेळेत पार पडल्याचे सांगण्यात आले. 
 

कासगंज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आज उघडकीस आली. योगी आदित्यनाथ यांना कासगंज येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या हेलिपॅडऐवजी एका शेतात उतरले. दरम्यान, मुख्यमंत्री सुरक्षित असून, त्यांचे नियोजित कार्यक्रम वेळेत पार पडल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कासगंज येथे एक दिवसाचा दौरा होता. यासाठी शाळेच्या ग्राऊंडवर तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मात्र, हेलिकॉप्टर तेथून एक किलोमीटरच्या अंतरावरील शेतात उतरले. त्यामुळे सुरक्षा दलाची धावपळ उडाली. मुख्यमंत्री सुरक्षित असून, त्यांचे नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणे झाल्याची माहिती राज्याचे गृहसचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. फरौली गावातील एका कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली असून, त्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांची आदित्यनाथ यांनी भेट घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. 

Web Title: Adityanath's helicopter landing in farm