आदिवासी संघटनांकडून 'नागालॅंड बंद'ची हाक

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कोहिमा : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत महिलांना दिलेल्या आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आज संयुक्त समन्वय समिती (जेसीसी) आणि नागालॅंड आदिवासी जमाती कृती समितीने (एनटीएसी) या संघटनांनी उद्या (ता.13) "नागालॅंड बंद'ची हाक दिली आहे.

महिलांना मिळालेल्या आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांना त्यांची नैतिक जबाबदारी पार पाडण्यात अपयश आल्याचा आरोप संघटनांनी करत, हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. या बंदला कोहिमा अनगामी तरुण संघटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे.

अत्यावश्‍यक सेवांना या बंदमधून सूट देण्यात आली असून, सरकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, संघटनांनी झेलियांगच्या राजीनाम्याची मागणीही केली होती.

Web Title: adivasi calls nagaland bandh