'कारगिल युद्ध होणार हे अडवाणींना माहीत होते'

पीटीआय
सोमवार, 10 डिसेंबर 2018

चंडिगड : "कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट "रॉ' या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अमरजीतसिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याचे बोलले जात होते, आता या खुलाशाने नवा वाद निर्माण होऊ शकतो. 

चंडिगड : "कारगिल युद्ध होणार असल्याची गुप्त माहिती तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांना होती,'' असा गौप्यस्फोट "रॉ' या गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अमरजीतसिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याचे बोलले जात होते, आता या खुलाशाने नवा वाद निर्माण होऊ शकतो. 

पाकिस्तानबरोबरील कारगिल युद्ध 199मध्ये झाले. त्या वेळी दुलत हे "इंटेलिजन्स ब्यूरो'मध्ये होते. चंडिगडमध्ये सैन्य साहित्य महोत्सवात बोलताना दुलत यांनी हा गौप्यस्फोट केला. ""कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावर भाष्य करीत आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली होती. युद्धापूर्वीच आम्ही आडवाणींना ही माहिती दिली होती,'' असे ते म्हणाले. 

या कार्यक्रमाला निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, "रॉ'चे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर उपस्थित होते. या तिघांनीही दुलत यांच्या मताशी सहमती दर्शवत गुप्त माहिती जास्त काळ ठेवून चालत नाही. त्यावर त्वरित योग्य कारवाई व्हायला हवी, असे स्पष्ट केले. 

"जम्मू-काश्‍मीर आणि इशान्य भारतात होणाऱ्या कारवाया या केवळ 30 टक्के गुप्त माहितीच्या आधारे होतात. कोणीही संपूर्ण गुप्त माहिती येईपर्यंत थांबू शकत नाही,' असे लंगर यांनी सांगितले. तर, प्रत्येक अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणांवर सोडून चालणार नाही, हे व्यवस्थेचे अपयश असते,' असे डावर यांनी स्पष्ट केले. तसेच, भारतीय व्यवस्थेत सर्व गुप्तचर यंत्रणांची सूत्रे एखाद्या व्यक्तीच्या हाती असणे आत्मघाती ठरू शकते, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. 

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाक लष्कराच्या हातचे बाहुले आहेत काय? असा सवाल दुलत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी इम्रान यांना आपण अजून वेळ दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Advani knows Kargil will fight