इस्त्रोच्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) "पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या मदतीने आज (ता. 29) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
 

बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) "पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या मदतीने आज (ता. 29) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही-सी43'चे प्रक्षेपण केले आहे. या प्रक्षेपकाच्या मदतीने "एचवायएसआयएस' या "इस्त्रो'च्या महत्त्वाकांक्षी उपग्रहासह आठ देशांच्या 30 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.

"पीएसएलव्ही-सी43' मोहिमेतील "एचवायएसआयएस' हा प्राथमिक उपग्रह आहे. त्याचे वजन 380 किलोग्राम आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अचूक निरीक्षण करण्याची क्षमता असलेल्या या उपग्रहाचे आयुष्यमान पाच वर्षांचे असणार आहे. या उपग्रहाशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅंड, नेदरलॅंड, स्पेन आणि मलेशिया यांच्या 30 व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे, असे "इस्त्रो'ने स्पष्ट केले. 
"पीएसएलव्ही' या "इस्त्रो'च्या यशस्वी प्रक्षेपकाचे हे 45वे उड्डाण आहे.

Web Title: Advertising ISRO PSLV C 43 launch