भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून महिलेने केले मुंडण

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

भाजप नेता सतीश शर्मा हा ही पेशाने वकिल असून या महिला वकिलाचा वरिष्ठ सहकारी आहे. त्याने तिचा व्हिडीओ करून तिला तीन वर्ष धमकावत असल्याचा आरोप तिने शर्मावर केला आहे. या मानसिक छळाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार केली, पण त्यांनीही प्रतिसाद न दिल्याने तिने पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांसमोर केस कापायला सुरवात केली. 

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका महिला वकिलाने पत्रकार परिषदेदरम्यान अचानक केस कापायला सुरवात केली. तेथील भाजप नेत्यावर तिने बलात्काराचा व मानसिक छळाचा आरोप केला आहे. यासाठीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांसमोर हा प्रकार घडला.    

भाजप नेता सतीश शर्मा हा ही पेशाने वकिल असून या महिला वकिलाचा वरिष्ठ सहकारी आहे. त्याने तिचा व्हिडीओ करून तिला तीन वर्ष धमकावत असल्याचा आरोप तिने शर्मावर केला आहे. या मानसिक छळाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार केली, पण त्यांनीही प्रतिसाद न दिल्याने तिने पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांसमोर केस कापायला सुरवात केली. 

शर्मा हा या महिलेला मानसिक छळासोबतच मारहाणही करत असे, त्याने यापूर्वी माझे केस कापले होते, असा आरोप तिने केला आहे. तिच्याकडे कोणताही पर्याय राहिला नसल्याने तिने मुंडण करायचा पर्याय निवडला, असे तिने सांगितले. शर्मा राजकीय नेता असल्याने त्याला काही होणार नाही, पण मी भितीच्या छायेखाली वावरत आहे, तसेच माझ्या कुटूंबाला धोका आहे. तसेच मी दलित असल्याने माझ्यावर अत्याचार केला गेला, असेही तिने यावेळी सांगितले. 

Web Title: advocate cuts her hair in press conference for raped by bjp leader