अफगाणिस्तानातील स्फोटामध्ये 30 ठार 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

अफगाणिस्तानातील पूर्वेकडील खोस्त शहरात मशिदीमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात 30 नागरिक ठार झाले, तर तितकेच जण जखमी झाले आहेत.

काबूल : अफगाणिस्तानातील पूर्वेकडील खोस्त शहरात मशिदीमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात 30 नागरिक ठार झाले, तर तितकेच जण जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे याच मशिदीमध्ये मतदार नोंदणी केंद्रदेखील होते. दरम्यान, अन्य कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सुरवातीस "तालिबान' आणि "इसिस' या दहशतवादी संघटनांनी हा हल्ला केला असावा, अशी शक्‍यता वर्तविली जात होती; पण या संघटनांनीही या हल्ल्याची जबाबदारी घेणे टाळले आहे.

Web Title: Afghanistan Bomb Blast