आफ्रिकन विद्यार्थिनीवर ग्रेटर नोएडात हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मार्च 2017

ग्रेटर नोएडा- ग्रेटर नोएडा येथे मारिया बुरुंडी (वय 20) या आफ्रिकन विद्यार्थिनीवर येथील तीन-चार जणांनी बुधवारी पहाटे हल्ला केला. त्यांनी केलेल्या मारहाणीत ती जखमी झाली आहे. यापूर्वी आफ्रिकन विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा दोन घटना गेल्या आठवड्यात येथे घडल्या आहेत. यात पाच जणांना अटक झाली आहे.

मारिया ही मूळची केनियाची आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (ता.28) रात्री ग्रेटर नोएडातील ओमीक्रॉन सेक्‍टरजवळ हा हल्ला झाला. ओला कॅबमधून काल रात्री प्रवास करीत असताना काही अनोखळी माणसांनी गाडी थांबवून तिला बाहेर खेचले आणि मारहाण केली, असे मारियाने तक्रारीत म्हटले असल्याचे उपपोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. कैलास रुग्णालयात उपचारानंतर तिला सोडण्यात आले. पोलिसांनी "एफआयआर' दाखल करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

मारियाने नोएडा आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नुकताच प्रवेश घेतला आहे. भावाला भेटण्यासाठी ती ग्रेटर नोएडातील अलस्टेनिया सोसायटीत आज पहाटे पाच वाजता कॅबने आली होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तिला धक्का बसला असून, काही काळ ती बोलू शकत नव्हती, असे "असोसिएशन ऑफ आफ्रिकन स्टुडंट्‌स इन इंडिया' या संघटनेचा समन्वयक उमर नजीब याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

ही घटना घडल्यानंतर ग्रेटर नोएडा येथे पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. शीघ्र कृती दल आणि शीघ्र प्रतिसाद दलाचा बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला आहे, असे गौतम बुद्धनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सुजातासिंग यांनी सांगितले. अलस्टेनिया सोसायटीत राहणाऱ्यांमध्ये आफ्रिकन नागरिकांची संख्या मोठी आहे. या सोसायटीत जाणाऱ्या वाहनांना हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: African students attack in the Greater noieda