
Shraddha Murder Case: आफताबने सांगितलं हत्येचं खरं कारण; 'श्रद्धा दुसऱ्या मुलासोबत डेटवर...'
श्रद्धा हत्याप्रकरणी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट करण्यात आली. या दरम्यान आफताबला महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, त्याने श्रद्धाच्या कपड्यांसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. एफएसएलचे सहायक संचालक संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने नार्को टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. इतकेच नव्हे तर आफताबने नार्को टेस्टमध्ये श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले. याचबरोबर श्रद्धाचा खून का केला याबाटची माहितीही आफताब पूनावाला याने दिली आहे.
आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 17 मे रोजी श्रद्धा वालकर दुसऱ्या मुलासोबत डेटवर गेल्यामुळे त्याला राग अनावर झाला होता. रागाच्या भरात आफताबने श्रद्धाचा खून केला. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. आफताबने यापूर्वी पोलिसांसमोर सांगितलं होतं की, त्याचं श्रद्धासोबत ब्रेकअप झालं होतं. ते नात्यात नव्हते. दोघेही रूम पार्टनर म्हणून सोबत राहत होते. त्यानंतर आफताबने आता आणखी एक खुलासा केला आहे, की 17 मे रोजी श्रद्धा 'बंबल' या डेटिंग अॅपवरून ओळख झालेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. ती 18 मे रोजी दुपारी त्यांच्या मेहरौली येथील फ्लॅटवर परत आली तेव्हा या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि चिडलेल्या आफताबने तिचा खून केला.
हे ही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
आफताबने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी 'बंबल' या ॲपला पत्र लिहून श्रद्धाच्या अकाउंटची सर्व माहिती मागवली आहे. पण मिळालेलं उत्तर अद्याप उघड केले नाही. नार्को-अॅनालिसिस टेस्टमध्ये आफताबने सांगितले, की बद्री नावाच्या मित्राच्या घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्याचा विचार सुचला असंही त्याने पोलिसांना सांगितले आहे.
हेही वाचा: Shraddha Murder Case: श्रद्धाची कपडे कुठे फेकुन दिली; अफताबने दिले स्पष्टीकरण