'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या जोडप्याने केला 48 वर्षांनी विवाह

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

या विवाहबंधनात अडकलेल्या 80 वर्षीय 'तरुणा'चे नाव आहे, देवदास तर 76 वर्षीय 'तरुणी'चे नाव आहे, मधूबाई. हे दोघेही उदयपूर येथील पर्गीयापाडा गावात राहत आहेत. त्यांचा विवाह लावून देण्याचे त्यांचे नातू, पणतू यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी आजोबांच्या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. 

उदयपूर : विवाह न करता अनेकदा जोडपे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत असतात. त्यादरम्यान त्यांच्या भेटीगाठीही होत असतात. पण यातील काही जोडपे विवाहबंधनात अडकतातही. असाच प्रकार उदयपूरमध्ये झाला. 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या 'तरुण' जोडप्याने तब्बल 48 वर्षांनी विवाह केला. 

या विवाहबंधनात अडकलेल्या 80 वर्षीय 'तरुणा'चे नाव आहे, देवदास तर 76 वर्षीय 'तरुणी'चे नाव आहे, मधूबाई. हे दोघेही उदयपूर येथील पर्गीयापाडा गावात राहत आहेत. त्यांचा विवाह लावून देण्याचे त्यांचे नातू, पणतू यांनी ठरवले होते. त्यानुसार त्यांनी आजोबांच्या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. 

सिताराम यांचे पुत्र देवदास कळसूआ यांचा चंपाबाई यांच्याशी यापूर्वीच विवाह झाला होता. मात्र, देवदास हे मधूबाईसोबत शेजारील गावात पळून गेले होते. त्यानंतर देवदास यांनी त्यांची पहिली पत्नी चंपाबाई आणि मुलासोबत असताना मधू यांना घरी आणले. त्यानंतर चंपाबाई त्यांच्या मुलांसह फलासिया येथे वास्तव्यास गेल्या.  

देवदास आणि मधू हे दोघे गेल्या 48 वर्षांपासून एकत्र राहत असल्याने या दोघांच्या नातेवाईकांनी त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. त्यानुसार वराकडचे लोक वधूच्या घरी आले आणि 'भंजना' विधी पूर्ण झाला. 

Web Title: After 48 years Udaipur man marries live in partner Leave in Relationship