9 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जवानांना मिळाले बुलेटप्रूफ जॅकेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

'मेक इन इंडिया' या योजनेंतर्गत 639 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. या करारानुसार लष्कराला 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानांना अखेर तब्बल 9 वर्षांनंतर अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट मिळाले आहेत. यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून काल (सोमवार) 'मेक इन इंडिया' या योजनेंतर्गत 639 कोटी रुपयांचा करार करण्यात आला. या करारानुसार लष्कराला 1.86 लाख बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

bulletproof jacket indian army

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराकडून बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने 2009 मध्ये ही मागणी मान्य केली होती. मात्र, त्यावेळी लष्कराने आयोजित केलेल्या ट्रायलमध्ये एकही कंपनी टिकू शकली नाही. याबाबत संरक्षण मंत्रालयाने सांगितले, की 1,86,138 बुलेटप्रूफ जॅकेटच्या मागणीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेली ही बुलेटप्रूफ जॅकेट जवानांना आवश्यक सुरक्षा पुरवतील, असा दावाही करण्यात आला आहे. 

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने 'एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेज' या कंपनीसोबत हा करार केला आहे. त्यानंतर आता ही अत्याधुनिक जॅकेटस् जवानांना लवकरच मिळणार आहेत. 

Web Title: After 9 Year Wait Indian Soldiers To Finally Get Bulletproof Jackets