डोवाल यांच्या दौऱ्यानंतर काश्‍मीरमध्ये 10 हजार जवानांची कुमक वाढविली

डोवाल यांच्या दौऱ्यानंतर काश्‍मीरमध्ये 10 हजार जवानांची कुमक वाढविली

मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांचा काश्‍मीर दौरा आटोपताच खोऱ्यात दहा हजार जवानांची कुमक पाठविण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. अर्थात, यापूर्वीच काही जवान तेथे पोचले आहेत. या दलाच्या रवानगीने काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क मोडून काढण्याच्या प्रयत्नांना आणखी मदत मिळेल, असे सूत्राने म्हटले आहे.

काश्‍मीर खोऱ्यातील घातपाती कारवायांना रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या शंभर तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) शंभर तुकड्या म्हणजे दहा हजार जवान पाठविण्याचे 25 जुलै रोजी आदेश दिले. या जवानांना रेल्वेने पाठविण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. दरम्यान, गृहमंत्रालयाच्या निर्णयाचा माजी मुख्यंमत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विरोध केला आहे. या निर्णयामुळे काश्‍मीर खोऱ्यात भीतीचे वातावरण तयार होईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, एनएसएचे डोवल हे बुधवारीच काश्‍मीर दौऱ्यावर गेले होते. तेथे सुरक्षा दल, गुप्तचर संस्था आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात राज्यपालचे सल्लागार के. विजयकुमार, मुख्य सचिव बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, डीजीपी दिलबाग सिंह, आयजी एसपी पाणि या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काश्‍मीर दौऱ्यात दिल्लीहून आयबी अधिकाऱ्यांची टीमही सहभागी झाली होती. काल मात्र गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशात निमलष्करी दलाची आणखी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com