अलाहाबादनंतर आता बदलणार 'या' प्रसिद्ध शहराचे नाव

After Allahabad Shimla could be renamed Himachal govt wants to call it Shyamala
After Allahabad Shimla could be renamed Himachal govt wants to call it Shyamala

शिमला- उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर आता हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला या शहराचेही नाव बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. शिमला या शहराचं नाव बदलून श्यामला असे केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय शहरातील, रिज, स्कँडल पॉईंट, पीटरहॉप, डलहौसी, व्हॉईसराय गिल अॅडव्हान्स स्टडी या ठिकाणांची नावंही बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नाव बदलण्याच्या मागणीबाबत येथील सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद शिमला शहराचे नाव बदलण्याबाबत मागणी करत आहे. मात्र 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी शिमला हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याचे सांगत ती मागणी फेटाळली होती.

शिमलाचं नाव बदलून श्यामला करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत भाजपा नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री विपिन सिंह परमार म्हणाले की, जर जनतेच्या भावना नाव बदलण्याच्या बाजूने असतील तर यावर विचार करण्यास काहीच हरकत नाही. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरभजन सिंह यांनी शिमलाचं नाव अजिबात बदलू नये असं म्हटले आहे. हे ऐतिहासिक शहर आहे असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com