...म्हणून भारत-पाक सीमारेषेवर ईदनिमित्त मिठाई वाटप नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. तसेच पाकिस्तानकडून भारतीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघनही सातत्याने केले जात आहे. त्यामुळे यंदा ईद-उल-फितर निमित्ताने आज (शनिवार) अत्तारी-वाघा सीमारेषेवर मिठाई वाटप केले जाणार नाही.

जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर दरवर्षी ईदनिमित्ताने दोन्ही देशांकडून मिठाई वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात असतात.  पाकिस्तानकडून शनिवारी सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच भारतीय लष्करातील जवानावर नौशेरा सेक्टरमध्ये हल्ला करण्यात आला. दरम्यान, काश्मीरच्या अनंतनाग येथे 20 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यादरम्यान पोलिस आणि नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. ही भांडणे ईदच्या नमाज पठणानंतर करण्यात आली होती. 

Web Title: After ceasefire violations no exchange of sweets between India Pakistan at Attari Wagah border this Eid