कमलनाथ यांच्यानंतर आता भाजप मंत्र्याची जीभ घसरली; काँग्रेस आक्रमक

congress bjp
congress bjp

भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपच्या महिला नेत्याबद्धल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वाद निर्माण झालेला असताना आता भाजपच्या मंत्र्यांची जीभ घसरली. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि उमेदवार बिसाहूलाल सिंह यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे नेते विश्‍वनाथ कुंजाम यांच्या दुसऱ्या पत्नीचा उल्लेख वादग्रस्तरित्या केला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी  काँग्रेसने केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये येत्या ३ नोव्हेंबरला २८ जागांवर पोटनिवडणुक होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचार मोहिमा सुरू असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र टीका करताना काही नेत्यांचे भान राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. काल कमलनाथ यांनी शिवराज सिंह यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांना ‘आयटम’ असे म्हटले होते. आता शिवराजसिंह यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि अनूपपुर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिंह यांनी  काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीचा अवमानकारक शब्दाचा वापर केला. बिसाहूलाल सिंह यांच्या पत्नीवर केलेल्या असभ्य टीकेचा व्हीडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. बिसाहूलाल म्हणतात की,  काँग्रेसचे उमेदवार विश्‍वनाथ सिंह कुंजाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पहिल्या पत्नीचा उल्लेख न करता दुसऱ्या महिलेचा उल्लेख केला आहे. कुंजाम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून त्यानंतर त्यांनी राजावती सिंह यांच्याबरोबर विवाह केला.
 
Corona: WHO प्रमुखांनी हिंदीमध्ये ट्विट करत भारताचे मानले आभार; वाचा कारण

काँग्रेसकडून टीकेचा भडिमार

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेश  काँग्रेसने म्हटले की, शिवराज सिंह जी, आपल्या उमेदवाराने महिलेविषयी जे उदगार काढले आहेत, त्यावरून भाजपची खरी संस्कृती कळते. काल आपण मौन धरणे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. आता सत्य सांगा.  काँग्रेसचे प्रवक्ते सय्यद जाफर यांनी ट्विटरवर सिंह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. महिलेचा अपमान केल्याबद्धल त्यांनी टीका केली आहे. भाजपकडून महिलेविषयी अशाच शब्दाचा वापर केला जातो काय? असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि सिंह यांना पदावरून काढून टाकावे तसेच महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

कुंजाम मानहानीचा दावा दाखल करणार

काँग्रेसचे उमेदवार कुंजाम यांनी बिसाहुलाल यांच्या वक्तव्यावर टीका करत मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. आपण पंधरा वर्षापूर्वी विवाह केला असून चौदा वर्षाची मुलगी आहे. आपण भाजपच्या उमेदवाराचा पर्दाफाश करु, असे कुंजाम म्हणाले. एकीकडे महिलेच्या सन्मानासाठी मौनव्रत करण्याचे जाहीर केलेले असता दुसरीकडे अवमान करत असल्याचे कुंजाम म्हणाले. याबाबत भाजपकडून प्रतिक्रिया तातडीने उपलब्ध होऊ शकली नाही. राज्य भाजपचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल म्हणाले की, सिंह सध्या प्रचारासाठी दुर्गम भागात असल्याने त्यांचा संपर्क होत नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com