अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपचा युती तोडण्याचा निर्णय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये अंतर्गत वाद चालू होता. हे कारण पुढे करुन भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. आज (मंगळवार) अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने दिले आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शहाबरोबर, भाजपचे अन्य महत्वाचेही नेते उपस्थित होते.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये जवानांवर होणारे सातत्याने हल्ले आणि रमजानच्या महिन्यातही झालेला गोळीबार या घटनांमुळे भाजप आणि पीडीपी सरकारमध्ये अंतर्गत वाद चालू होता. हे कारण पुढे करुन भाजपने सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. आज (मंगळवार) अजित डोभाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने दिले आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शहाबरोबर, भाजपचे अन्य महत्वाचेही नेते उपस्थित होते.

आज झालेल्या या बैठकीनंतर राम माधव यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन घोषित केला. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींदर रैना आणि पक्षाचे महासचिव आशो कौल यांनाही या बैठकीला बोलवण्यात आले होते. 

भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्यानंतर मात्र जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते राम माधव यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

Web Title: After the discussion with Ajit Doval, BJP decide alliance get broken