आता 'टाइम'ही म्हणतेय, 'नमो-नमो'!

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

- 'प्रमुख विभाजक' म्हणून करण्यात आला होता यापूर्वी उल्लेख

- भाजपला बहुमत मिळताच घेतली कोलांटी उडी.

नवी दिल्ली : प्रसिद्ध 'टाइम' या मासिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख 'प्रमुख विभाजक' (Divider in Chief) म्हणून यापूर्वी करण्यात आला होता. मात्र, आता भाजपला पुन्हा बहुमत मिळाल्यानंतर टाइमने कोलांटी उडी घेत नवा लेख प्रकाशित केला. यामध्ये मोदींची स्तुती करण्यात आली.  

नरेंद्र मोदी यांचा विभाजक असा उल्लेख असलेला लेख 10 मेच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या लेखानंतर देशभरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. टाइमची ही कव्हर स्टोरी लोकसभा निवडणुकीच्या मध्यात आली होती. मात्र, आता निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार स्थापन होत आहे. त्यानंतर आता मोदींची स्तुती करणारा लेख टाइमने प्रसिद्ध केला आहे. ज्यात त्यांनी लिहिले, की आतापर्यंत दशकात कोणत्याही पंतप्रधानास जमले नाही, अशाप्रकारे मोदींनी देशाला एकसंध बनवले आहे. (Modi united India like no PM in decades)

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या या विजयानंतर मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्वांच्या शुभेच्छांनंतर मोदींची स्तुती करणारा लेख आता टाइमकडून प्रकाशित करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Divider in Chief TIME magazine now says Modi united India like no PM in decades