गडकरींच्या तंबीनंतर शेहला रशीद म्हणते 'ते' ट्विट उपरोधिक

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

गडकरी यांच्या या ट्विटनंतर शेहला यांनी आणखी एक ट्विट करत यापूर्वी करण्यात आलेले टि्वट उपाहासाचा एक भाग होता, असे स्पष्टीकरण देत टि्वट मागे घेतले. 

नवी दिल्ली : 'जेएनयू' विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात गंभीर ट्विट केले होते. मात्र, गडकरींनी या ट्विटची गंभीर दखल घेत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अखेर शेहला यांनी ते ट्विट मागे घेतले. 

शेहला यांनी टि्वट केले होते, की ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचत आहेत''. या ट्विटची गडकरींनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर गडकरी यांनीही ट्विटवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''ज्यांनी माझ्यावर मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. अशा समाजकंटकांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे''. 

दरम्यान, गडकरी यांच्या या ट्विटनंतर शेहला यांनी आणखी एक ट्विट करत यापूर्वी करण्यात आलेले टि्वट उपाहासाचा एक भाग होता, असे स्पष्टीकरण देत टि्वट मागे घेतले. 

Web Title: After Gadkari said legal action will take Rashid back the tweet