ऍमेझॉनवर गांधीजींचे चित्र असणारी चप्पल

वृत्तसंस्था
रविवार, 15 जानेवारी 2017

किंमत 16.99 डॉलर प्रति जोडी
ऍमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर गांधीजींचे चित्र असलेली चप्पलच्या एका जोडीची किंमत 16.99 डॉलर आहे. जागतिक बाजारात ही चप्पल विक्री होत आहे. यावर अद्याप भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली - भारतीय ऑनलाइन बाजारातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या ऍमेझॉनने पुन्हा एकदा भारतीय प्रतिकांना चुकीच्या पद्धतीने बाजारात आणले आहे.

काही दिवसांपूर्बीच तिरंग्याची वादग्रस्त पायपुसणी विक्रीसाठी आणली होती. आता ऍमेझॉनने महात्मा गांधी यांचे चित्र असलेली चप्पल ऑनलाइन बाजारात विक्रीसाठी आणली आहे. यामुळे आणखी वाद ओढाविण्याची शक्‍यता आहे.

मागील काही दिवसांमध्ये ऍमेझॉनने कॅनडाच्या वेबसाइटवर भारतीय ध्वजाची पायपुसणीची विक्री केली होती. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करून इशारा दिल्यानंतर पायपुसणीचे उत्पादन मागे घेतले होते. आता महात्मा गांधींवर आधारित उत्पादनामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

किंमत 16.99 डॉलर प्रति जोडी
ऍमेझॉनच्या अधिकृत वेबसाइटवर गांधीजींचे चित्र असलेली चप्पलच्या एका जोडीची किंमत 16.99 डॉलर आहे. जागतिक बाजारात ही चप्पल विक्री होत आहे. यावर अद्याप भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Web Title: After Indian Flag, Amazon Now 'Flip-Flops' With Mahatma Gandhi's Image