'युपी'तील विजयासाठी सप-काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला यज्ञ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

येथील लोकप्रिय महादेव मंदिरात आज काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यज्ञाचे आयोजन केले. कार्यकर्त्यांनी यावेळी विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. या यज्ञासाठी उपस्थित असलेल्या दोन्ही पक्षाच्य कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे बॅनर, पोस्टर, ध्वज आणि नेत्यांचे छायाचित्रे सोबत आणले होते.

कानपूर (उत्तर प्रदेश) - मतदानोत्तर चाचणीमधून भाजपच्या बाजूने स्पष्ट बहुमताचा कल आल्याने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी देवाकडे साकडे घालण्यासाठी आज (शुक्रवार) यज्ञाचे आयोजन केले.

येथील लोकप्रिय महादेव मंदिरात आज काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यज्ञाचे आयोजन केले. कार्यकर्त्यांनी यावेळी विजयासाठी प्रार्थना करण्यात आली. या यज्ञासाठी उपस्थित असलेल्या दोन्ही पक्षाच्य कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाचे बॅनर, पोस्टर, ध्वज आणि नेत्यांचे छायाचित्रे सोबत आणले होते. मतदानोत्तर चाचणीतून भाजपला बहुमत मिळेले असे दिसून येत आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी या चाचण्यांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत दबावाखाली चाचण्यांमधून समोर आलेले खरे निकाल बदलले असल्याचा आरोप केला आहे. तर भाजप नेते श्रीकांत शर्मा यांनी यादव यांच्यावर टीका करत "समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली तेव्हा किंवा ज्यावेळी अखिलेशजी बहुजन समाज पक्षासोबत आघाडीबाबत चर्चा करत होते त्यावेळी रामगोपालजींवर कोणता दबाव होता?' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भारतीय जनता पक्षालाच बहुमत मिळेल असे समोर आले आहे. त्यामुळे इतर पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Web Title: After luring voters, it's time to lure god: SP-congress organise havan