नीरव-चोक्सीनंतर 'पीएनबी'ला इंग्लंडकडून 'चुना'

After Neerav Choksi PNB financial scam in England
After Neerav Choksi PNB financial scam in England

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार करून नीरव मोदी, मेहुल चोक्सी परदेशात पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर आता 'पीएनबी'ला इंग्लंडने सुमारे 271 कोटी रुपयांचा 'चुना' लावल्याचे समोर आले.

याप्रकरणी पीएनबीच्या सहाय्यक कंपनीने पाच भारतीय, एक अमेरिकी आणि इतर तीन कंपन्यांवर खटला दाखल केला आहे. याबाबत बँकेने दावा केला, की त्यांनी बँकेची फसवणूक करून कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. आता या सर्वांकडून सुमारे 271 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. 

दरम्यान, पंजाब इंटरनॅशनल लिमिटेडच्या इंग्लंडमध्ये (यूके) सात शाखा आहेत. यातील एक कंपनी म्हणजे पंजाब नॅशनल बँक. या कंपनीने या गैरव्यवहार प्रकरणातील संबंधितांवर खटला दाखल केला आहे. या सर्वांनी कर्ज घेताना बनावट कागदपत्रे दाखल केले, असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com