
शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट 9 जुलैला कायमचे बंद झाले. तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही येथील गुलाबजाम खूप आवडायचे. मोदी ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपाचे प्रभारी होते त्यावेळी ते या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे.
शिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील आवडते रेस्टॉरंट अखेर बंद झाले आहे. शिमल्यातील मॉलरोडवरील 65 वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट मंगळवारी बंद झाले.
शिमल्यातील सर्वात जुन्हा रेस्टॉरंटपैकी एक असणारे हे रेस्टॉरंट 9 जुलैला कायमचे बंद झाले. तेथे मिळणारा गुलाबजामसाठी खूप लोकप्रिय होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही येथील गुलाबजाम खूप आवडायचे. मोदी ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपाचे प्रभारी होते त्यावेळी ते या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे. नुकताच त्यांनी नमो ऍपवरुन एका ब्लॉगमध्ये या रेस्टॉरंटचा आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ठ गुलाबजामचा उल्लेख केला होता. मोदींबरोबरच इतरही अनेक दिग्गज येथे मिळणाऱ्या गुलाबजामचे चाहते होते.
सर्वोच्च न्यायालयाने 15 जुलैला या रेस्टॉरंटच्या मालकाला जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे. ही जागा खाली करुन लवकरात लवकर ती खऱ्या मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने या रेस्टॉरंटच्या मालकाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायलयामध्ये या रेस्टॉरंटसंबंधीत खटला सुरु होता. हा खटला नंतर उच्च न्यायलयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला. जागेचा मालक हा रेस्टॉरंट मालकाकडून अधिक भाड्याची मागणी करत असल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला होता. बाजार भावानुसार शिमल्यामधील या जागेचे भाडे दर महिन्याला दीड लाख रुपये इतके आहे. मात्र जागेचे मालक रेस्टॉरंट मालकाकडून 25 लाख रुपयांची मागणी करत होता. यावरुनच हा वाद न्यायलयात गेला आणि न्यायालयाने हा वाद मिटवण्यासाठी रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 10 जुलै हा रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्यासाठी न्यायालयाकडून देण्यात आलेला शेवटचा दिवस होता.